जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर — जिल्हा सेतू समिती

आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी प्रणाली

Aaple Sarkar Seva Kendra Registration Portal, District Latur — Government of Maharashtra

04/10/2026 15:32

अंतिम जाहिरात २०२६ · अर्जदारांसाठी अधिकृत माहिती

तपासणीचे टप्पे

अर्जापासून अंतिम निवडीपर्यंतचा प्रवास

महत्त्वाचे: सर्व अपलोड केलेली प्रमाणपत्रे व कागदपत्रे स्वयंसाक्षांकित असावीत. अर्ज अंतिम सादर केल्यानंतर कोणतेही नवीन कागदपत्र स्वीकारले जाणार नाही.
०६

Application lifecycle

अर्ज तपासणीचे विविध टप्पे

  1. १

    प्राथमिक कागदपत्र छाननी

    अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या आधारे प्राथमिक छाननी करून पात्र/अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

  2. २

    पात्र/अपात्र यादीवरील हरकती व अंतिम पात्र/अपात्र यादी

    पात्र/अपात्र यादी प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती मागविण्यात येतील. प्राप्त हरकतींवर निर्णय घेऊन अंतिम पात्र/अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात येईल. याबाबतचे वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.

  3. ३

    प्रत्यक्ष कार्यालय पाहणी

    पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने प्रस्तावित कार्यालयाची प्रत्यक्ष पाहणी तपासणी पथकाद्वारे करण्यात येईल. तपासणीबाबतचे वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.

  4. ४

    मुलाखत

    पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने तपासणी झाल्यानंतर मुलाखतीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.

  5. ५

    संरचित मुलाखत व गुणवत्ता यादी

    जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत संरचित मुलाखत पूर्ण झाल्यावर १०० गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी (Merit List) प्रसिद्ध करण्यात येईल.

  6. ६

    प्राथमिक निवड यादीवरील हरकती

    प्राथमिक निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती मागविण्यात येतील. याबाबतचे वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.

  7. ७

    अंतिम निवड यादी

    प्राथमिक निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्राप्त हरकतींवर निर्णय घेऊन अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

ⓘ

महत्त्वाची सूचना

आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्याची संपूर्ण प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या संबंधित शासन निर्णयांमधील निर्देशांनुसार करण्यात येईल.

संबंधित शासन निर्णय:

  1. शासन निर्णय क्र. मातंस-१७१६/प्र. क्र. ५१७/३९, दिनांक १९ जानेवारी २०१८
  2. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक-आसेकें-१७२५/प्र.क्र. ८६/मातं (३९), दिनांक २७ मार्च २०२५
  3. इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग शासन निर्णय क्र. आसेकें-2026/प्र.क्र. 98/TECH-1 (E-1742666), दिनांक ०९ जुलै २०२६
अधिकृत संकेतस्थळ latur.maharashtra.gov.in

नोंद: संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अर्जदारांनी वरील अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या सूचना व निर्देश तपासावेत. या संदर्भात कार्यालयाकडून स्वतंत्र पत्रव्यवहार किंवा भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला जाणार नाही.

सर्व मार्गदर्शिका नवीन अर्जदार नोंदणी रिक्त केंद्रांची यादी पहा