जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर — जिल्हा सेतू समिती

आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी प्रणाली

Aaple Sarkar Seva Kendra Registration Portal, District Latur — Government of Maharashtra

04/10/2026 15:31

अंतिम जाहिरात २०२६ · अर्जदारांसाठी अधिकृत माहिती

गुण विभागणी

प्रत्येक निकषाच्या गुणांची सविस्तर विभागणी

महत्त्वाचे: सर्व अपलोड केलेली प्रमाणपत्रे व कागदपत्रे स्वयंसाक्षांकित असावीत. अर्ज अंतिम सादर केल्यानंतर कोणतेही नवीन कागदपत्र स्वीकारले जाणार नाही.
०४

Detailed marks

गुणांची सविस्तर विभागणी

शैक्षणिक पात्रता

१० गुण
उप-निकषगुण
किमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (HSC) उत्तीर्ण५
पदवी२
पदव्युत्तर पदवी३

संगणक व डिजिटल साक्षरता

१५ गुण
उप-निकषगुण
MS-CIT किंवा सक्षम / समकक्ष CCC प्रमाणपत्र१३
सायबर सुरक्षा ज्ञानाबाबतचे प्रमाणपत्र२

पायाभूत सुविधा (प्रत्यक्ष पडताळणी)

१५ गुण
उप-निकषगुण
किमान १०० चौरस फूट स्वतंत्र कार्यालय२
२ संगणक / लॅपटॉप२
लेझर प्रिंटर१
स्कॅनर१
बायोमेट्रिक उपकरण१
वेबकॅम१
दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ प्रवेश१
UPS / पर्यायी वीज बॅकअप१
ब्रॉडबँड इंटरनेट - ग्रामीण १० Mbps / नागरी २० Mbps२
CCTV१
नागरिकांसाठी प्रतीक्षा व्यवस्था व सूचनाफलक१
शासनप्राधिकृत सेवाशुल्क दरफलक व बाह्य नामफलक१

ग्राहक सेवा व संवाद कौशल्य (मुलाखत)

२० गुण
उप-निकषगुण
शासकीय सेवांचे ज्ञान४
नागरिकाभिमुखता व सेवावृत्ती४
डिजिटल प्रणाली हाताळण्याची क्षमता४
समस्या सोडविण्याची क्षमता२
संवाद कौशल्य२
प्रामाणिकपणा व नैतिकता२
माहिती गोपनीयता व डेटा सुरक्षा जागरूकता२

संबंधित अनुभव

१० गुण
उप-निकषगुण
CSC / महा-ई-सेवा / बँकिंग प्रतिनिधी (BC) / ई-गव्हर्नन्स प्रकल्प / शासकीय सेवा केंद्र यांपैकी एक अनुभव५
वरीलपैकी एकापेक्षा जास्त अनुभव१०

व्यवसाय आराखडा

५ गुण
उप-निकषगुण
ग्रामीण नागरिकांसाठी सेवा विस्तार१
शासकीय योजना व सेवांची जनजागृती१
आर्थिक व्यवहार्यता व खर्चाचे नियोजन१
वार्षिक कृती आराखडा, सुविधा, प्रशिक्षण व ग्राहक समाधानाचे नियोजन१
नागरिकांना सेवा सुलभ करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना१

चारित्र्य पडताळणी

१० गुण
उप-निकषगुण
फौजदारी दोषसिद्धी व आर्थिक फसवणुकीचा इतिहास नसणे - चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र८
शासकीय काळ्या यादीत (Blacklisted) नसणे२

आर्थिक क्षमता

१० गुण

६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट, कर्ज मंजुरी / OD / वर्किंग कॅपिटल, मागील दोन वर्षांचे आयकर विवरणपत्र, NPA / कर्ज थकबाकी नसणे आणि आर्थिक शाश्वततेचे स्वयंघोषणापत्र यांच्या आधारे मूल्यांकन.

सामाजिक समावेशकता

५ गुण

महिला / माजी सैनिक / दिव्यांग / स्वयं-सहाय्यता बचत गट सदस्य / स्थानिक उद्योजक यांना प्रमाणपत्राच्या आधारे ५ गुण.

सर्व मार्गदर्शिका नवीन अर्जदार नोंदणी रिक्त केंद्रांची यादी पहा